

Thalapathy Vijay
esakal
किशोर अर्जुन
तीन दशकांपासून फक्त तमिळनाडूतीलच नाही, तर दक्षिण भारतातील सिनेसृष्टीवर वर्चस्व गाजवणारा तमिळ सुपरस्टार ‘थलपती’ विजयने अचानक सिनेसंन्यास घेतला. जनतेची सेवा करण्यासाठी त्याने राजकारणात प्रवेश केला असून ‘टीव्हीके’ नावाचा पक्षही स्थापन केलाय. तमिळनाडूत सुपरस्टार कलाकारांनी राजकारणात उतरणे नवे नाही; पण थलपतीच्या ‘जननायकन’ बनण्यापर्यंतच्या प्रवासाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे...