

2025 Nobel Prize in Medicine
esakal
२०२५ सालचा फिजियोलॉजी आणि मेडिसिनचा नोबेल पुरस्कार मेरी ई. ब्रन्को, फ्रेड राम्सडेल आणि शिमोन साकागुची या तीन संशोधकांना प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी मानवी रोगप्रतिकारक प्रणालीतील अत्यंत महत्वाच्या घटकावर परिधीय रोगप्रतिकारक सहिष्णुता (Peripheral Immune Tolerance) अत्यंत खोलवर संशोधन केले. या संशोधनामुळे रोगप्रतिकारक यंत्रणा कशी स्वतःच्या शरीराला हानी पोहोचवू नये यासाठी नियंत्रित केली जाते, हे अधिक स्पष्टपणे समोर आले. त्यामुळे अनेक गंभीर आणि गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करण्याचा एक नवीन मार्ग उपलब्ध झाला आहे.