

The Active Side of Infinity
विक्रम अवसरीकर - vikram.awsarikar@gmail.com
माया आणि इंका संस्कृतीचे अभ्यासक कार्लोस कास्टानेडा यांच्या ‘द ॲक्टिव्ह साइड ऑफ इन्फिनिटी’ या पुस्तकावर आधारित लेखातून माया, इंका आणि टोलटेक संस्कृतींच्या गूढ विचारविश्वाचा अभ्यास करताना आधुनिक गुंतवणूक, निर्णयप्रक्रिया आणि मानवी मानसिकता यांचा अनोखा संबंध उलगडून दाखविण्यात आला आहे. केवळ गुंतवणुकीविषयी नाही, तर स्वतःच्या विचारसरणीकडे नव्याने पाहण्याचा आणि आयुष्याकडे एका शिकाऱ्याच्या सजग नजरेने बघण्याचा प्रयत्न धनंजयराव आणि छोटू यांच्यातील खुमासदार संवादातून यात केला आहे.
‘‘हीदुनिया मायाजाल, मनुजा जाग जरा!!’’ धनंजयराव खुशीत गाणे गुणगुणत होते. कारणही तसेच घडले होते. इतक्या दिवसांपासून एका केसमध्ये काही गोष्टी अडकल्या होत्या. त्या अचानक त्यांना आलेल्या एका कल्पनेमुळे सुटल्या होत्या आणि खुनी पकडला गेला होता.
‘‘या केसचे नाव खरं तर ‘काडेपेटीचे रहस्य’ वगैरे ठेवायला पाहिजे होते, हो ना?’’ छोटूने आपला निकालच दिला. या केसमुळे त्यांचा जवळजवळ महिना गेला होता. छोटूने आशाच सोडली होती; पण धनंजयराव अचानक तपास सोडून दोन दिवस गायब झाले आणि जेव्हा परत आले, तेव्हा त्यांच्याकडे नक्की खून कसा झाला, याचा पूर्ण आराखडा तयार होता.