
ब्रिजेश सिंह
Brijeshbsingh@gmail.com
एआय आणि रोबोटिक्स हे निश्चितच भविष्य आहेत. एआय आणि रोबोटिक्समुळे ज्या पारंपरिक नोकऱ्या धोक्यात येतील, त्यांच्याऐवजी डेटा सायन्स, एआय इंजिनिअरिंग, रोबोटिक्स मेंटेनन्स अशा नवीन प्रकारच्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. त्यासाठी आपल्याला आतापासूनच तयार राहावं लागेल. आपल्या शिक्षण पद्धतीत तातडीने बदल करायला हवेत.