Premium|Chhatrapati Sambhajinagar Pollution : प्रदूषणाच्या विळख्यात छत्रपती संभाजीनगर; आरोग्यावर गंभीर परिणाम

Industrial Environmental Impact : पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषणाचा विळखा पडला असून, वाळूजसारख्या संवेदनशील भागात हवेचा दर्जा खालावल्याने लहान मुलांमध्ये श्वसनाचे गंभीर विकार वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे; आता ठोस उपाययोजनांची वेळ आली आहे.
Industrial Environmental Impact

Industrial Environmental Impact

esakal

Updated on

उद्धव भा. काकडे

छत्रपती संभाजीनगर. पर्यटनाची राजधानी, मराठवाड्याची राजधानी, मोठी उद्योगनगरी, मोठमोठ्या शिक्षण संस्था, मोठ्या वैद्यकीय सुविधा असलेल्या या शहराच्या लोकसंख्येने जवळपास २० लाखांचा पल्ला गाठला आहे. सोबतच प्रदूषणाचा फासही आवळला जात आहे. वाहनांची वाढती संख्या, बेसुमार बांधकामे, शहराच्या लागत असणारे कारखाने यामुळे हवेचे प्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण दिवसागणिक धोकादायक बनत चाललेले आहे. नागरी सुविधा देताना प्रदूषणाबाबत गांभीर्याने न केलेला विचार या स्थितीच्या मुळाशी आहे. ‘शुद्ध हवा घेतल्याने तब्येत बिघडली’ असे म्हणण्याची वेळ भविष्यात येऊ नये यासाठी आताच कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

शहराचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे प्रदूषणाच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. विशेषतः शहर परिसरातील वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन व शेंद्रा या औद्योगिक वसाहती लगत असलेल्या नागरी वसाहतींमधून एक ते १५ वर्षांच्या वयोगटातील मुलांना छातीचे विकार होत असल्याची माहिती २०२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर महापालिकेत झालेल्या तज्ज्ञांच्या एका बैठकीतून समोर आली होती. सध्याही २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी कमीतकमी ९३ तर जास्तीत जास्त १७० पर्यंत नोंदवला गेला. ही स्थिती शहराच्या आरोग्यावर परिणाम करणारी असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com