Premium|What is Agentic AI : ‘असिस्टिव्ह’पासून ‘एजंटिक’पर्यंत : स्वायत्त, तर्कशक्तीपूर्ण आणि जबाबदार एआयच्या नव्या युगात भारताची झेप

Reasoning Power in AI : 'असिस्टिव्ह' कडून 'एजंटिक एआय'च्या युगात प्रवेश करताना वाढलेली तार्किक क्षमता (Reasoning Power); पण त्याच वेळी डीपफेक, पूर्वग्रह आणि मानवी संपादनाची गरज यांवर प्रकाश टाकणारा विशेष लेख.
Reasoning Power in AI

Reasoning Power in AI

esakal

Updated on

प्रा. डॉ. दीपक ताटपुजे

सन २०२६चा सुवर्ण नियम असा आहे, की एआयकडे एका अतिशय हुशार पण कधीकधी अतिआत्मविश्वास असलेल्या शिकाऊ उमेदवारासारखे पाहावे. मानवानेच किंवा वापरकर्त्याने दिशा ठरवावी, डेटा पुरवावा आणि अंतिम संपादन नेहमी स्वतः करावे. जरी नियम असले तरी डीपफेकद्वारे पसरणारी चुकीची माहिती, वेगाने बदलणाऱ्या नोकऱ्यांची आव्हाने आणि यंत्रणेत नकळत शिरणारा पूर्वग्रह हे प्रश्न कायम आहेतच.

विशेषतः या वर्षाच्या सुरुवातीपासून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील प्रगतीने एक असा टप्पा गाठला आहे, जिथे तंत्रज्ञान केवळ प्रश्नांची उत्तरे देणारे साधन न राहता एक स्वायत्त सहाय्यकारी ठरले आहे. ‘जेमिनाय २.५ प्रो’ आणि ‘जेमिनाय एंटरप्राईज एजंट प्लॅटफॉर्म’ व अन्य काही एआय टूल्सच्या लाँचने या क्रांतीचा पाया रचला गेला असून, या बदलामुळे एआयकडे बघण्याचा आणि एआय वापरण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. आता आपण ‘असिस्टिव्ह एआय’कडून ‘एजंटिक एआय’च्या युगात प्रवेश केला आहे. पूर्वीचे एआय मॉडेल केवळ संवादापुरते मर्यादित होते, मात्र आताचे एआय प्रत्यक्ष कृती करण्यावर भर देत आहे.

या बदलाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे एआयची तार्किक क्षमता किंवा ‘रिझनिंग पॉवर’. आजचे एआय केवळ डेटा प्रोसेसिंग करत नाही, तर एखाद्या क्लिष्ट समस्येवर उत्तर देण्यापूर्वी मानवाप्रमाणे विचार करून टप्प्याटप्प्याने मार्ग काढते. यामध्ये ‘नेटिव्ह मल्टिमोडालिटी’चा समावेश असल्याने, एआय एकाच वेळी मजकूर, ऑडिओ आणि व्हिडिओवर प्रक्रिया करून अधिक अचूक निर्णय घेण्यास सक्षम झाले असले, तरी डेटाबेस विश्लेषणावर आधारित निर्णय प्रक्रिया, ही मर्यादा लक्षात घेणे आवश्यक आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com