Premium| The Chronicle Project: फ्लेम विद्यापीठात 'द क्रॉनिकल प्रोजेक्ट'ची सुरुवात, भारतातील जिल्ह्यांचे सखोल दस्तावेजीकरण ज्ञानाचे भंडार उघडे करणार

Indian Districts: फ्लेम विद्यापीठाने सुरू केलेला ‘द क्रॉनिकल प्रोजेक्ट’ भारतातील प्रत्येक जिल्ह्याची सांख्यिकीय व सांस्कृतिक माहिती एकत्र करतो. हा उपक्रम देशाच्या विविधतेचे सर्वंकष दस्तावेजीकरण करणारा पहिला प्रयत्न आहे
Premium| The Chronicle Project: फ्लेम विद्यापीठात 'द क्रॉनिकल प्रोजेक्ट'ची सुरुवात, भारतातील जिल्ह्यांचे सखोल दस्तावेजीकरण ज्ञानाचे भंडार उघडे करणार
Updated on

युगांक गोयल

प्रत्येक जिल्ह्याच्या माहितीची सविस्तर नोंद करण्यासाठी फ्लेम विद्यापीठात ‘द क्रॉनिकल प्रोजेक्ट’ची सुरुवात झाली आहे. भारताचे जिल्हानिहाय दस्तावेजीकरण करणारा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. वैविध्याने नटलेल्या भारताचा सांख्यिकी आणि सांस्कृतिक आशय टिपणाऱ्या, विश्वकोशासारख्या व्यापक स्वरूपातील माहितीची संहिता निर्माण करणे, हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे.

भारताच्या आर्थिक प्रगतीविषयी किंवा सांस्कृतिक वारशाबद्दल बोलताना आपण अनेकदा तपशीलवार राष्ट्रीय रचित कथन मांडतो. पण आपल्या देशाची रचना तशी नाही. गोंदियातील वस्तुस्थिती कोल्हापूरपेक्षा पूर्णपणे भिन्न असते. अन् या दोन्ही ठिकाणच्या वास्तवांचा मुंबईशी तर काही संबंधच नसतो. तरीही या दोन्ही स्थानिक वास्तवांचा सखोल, विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक माहिती मिळवणे आश्चर्यकारकरीत्या कठीण आहे. ही माहितीची कमतरता अन् तफावत फक्त शैक्षणिकदृष्ट्या अडचणीची नसून तिचे वास्तवात गंभीर परिणाम दिसतात. उदाहरणार्थ काही मोजक्या महानगरांचा अपवाद सोडला तर भारतातील कोणत्याही जिल्ह्याबद्दल तपशीलवार आणि सहज उपलब्ध माहिती शोधून बघा. काही अपुऱ्या, सांगोपांग नसलेल्या नोंदी सापडतीलही. पण संबंधित भागाची बोलीभाषा, पारंपरिक कलाप्रकार, शेतीपद्धती किंवा आर्थिक संरचना याबद्दल माहिती मिळत नाही. मग ती कुठे मिळवायची, हा प्रश्न उरतोच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com