Premium|Women Reservation Bill Controversy : चीत भी मेरी, पट भी मेरी

BJP vs Opposition 2026 Strategy : महिला आरक्षण विधेयक फेटाळले जाणे हा भाजपचा एक 'चुकलेला' मास्टरस्ट्रोक ठरला आहे. या राजकीय पेचप्रसंगाचा वापर करून भाजपने आता काँग्रेससह विरोधी पक्षांना महिलाविरोधी ठरवण्यासाठी देशव्यापी आक्रमक प्रचार मोहीम हाती घेतली आहे.
BJP vs Opposition 2026 Strategy

BJP vs Opposition 2026 Strategy

esakal

Updated on

सुनील चावके, ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख

महिला आरक्षणाचा विषय मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी जोडला गेला. सर्वपक्षीय सहमती न करताच त्याविषयी एकतर्फी निर्णय घेऊन त्यावर संसदेचे शिक्कामोर्तब करून घेण्याचा भाजपचा उद्देश होता. विरोधी पक्षांना अडकविण्यासाठी टाकलेला हा सापळा होता.

क्रिकेटमध्ये अनेकदा कव्हर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फलंदाजाच्या बॅटची कड घेऊन चेंडू थर्डमॅन सीमेबाहेर जाऊन पडतो. संसदेत भाजपने २०२९ मध्ये महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मोदी सरकारने आणलेल्या १३१व्या घटनादुरुस्ती विधेयकाचेही असेच झाले आहे. अर्थात, क्रिकेटच्या खेळात अशा फसलेल्या फटक्यांचे षटकारात रूपांतर योगायोगाने होते. ‘चीत भी मेरी, पट भी मेरी’ अशा पूर्वनियोजित दुहेरी उद्देशाने आणलेले हे विधेयक फेटाळले जाणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी ‘चुकलेला’ मास्टरस्ट्रोक ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com