

Gaza Peace Plan 2024
esakal
गाझा शांतता आराखड्याविषयी सुरू असलेल्या चर्चा या पश्चिम आशियाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. भू-राजकीय बदल, मानवी मूल्य जोपासण्याची निकड आणि प्रादेशिक समीकरणांमध्ये झालेल्या हालचाली यांनी मिळून या प्रदेशात शांततेसाठी एक छोटी पण महत्त्वाची संधी निर्माण केली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने इस्रायलवर केलेल्या अभूतपूर्व हल्ल्यानंतर आणि त्यावर इस्रायलने केलेल्या सैनिकी प्रतिसादानंतर सुरू झालेल्या युद्धाने जगाच्या अंतःकरणाला हादरा दिला. मानवतावादी संकट, राजकीय अस्थिरता आणि आर्थिक हालचाल यामुळे जगातील मोठ्या शक्तींना पुन्हा एकदा इस्रायल-पॅलेस्टाईन प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागले आहे. भारतासाठी, जो मागील काही वर्षांपासून आपल्या ‘लुक वेस्ट’ धोरणाद्वारे पश्चिम आशियात आपला प्रभाव वाढवत आहे, हा क्षण एक आव्हान आणि एक संधी दोन्ही आहे. गाझा शांतता आराखडा फक्त एक कागदी प्रस्ताव नसून ती आंतरराष्ट्रीय इच्छाशक्तीची परीक्षा आहे आणि भारताच्या वाढत्या आर्थिक, सामरिक आणि सांस्कृतिक हितांशी थेट जोडलेला आहे.