

Karvatkati Saree GI Tag
esakal
सध्या मराठी फॅशन वीकमुळे सर्वत्र गाजत आहे ती विदर्भातील पारंपरिक टसर सिल्कची करवतकाठी साडी. मंदिरांच्या शिखरांप्रमाणे किंवा करवतीच्या दात्यांप्रमाणे नक्षी असलेले काठ, संपूर्ण साडी आणि पदरावर नाजूक बुट्टे असलेली ही साडी सर्वांना भुरळ घालत आहे. मराठी फॅशन वीकमध्ये झालेल्या फॅशन शोमध्ये भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील ग्रीष्मा हँडलूमचे गोपीचंद निनावे यांनी तयार केलेली सुंदर करवतकाठी साडी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने परिधान केली होती. महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आणि विदर्भाची शान असलेल्या साडीच्या सौंदर्याने सर्वांनाच प्रभावित केले.