Double Standard Food in US and India
Esakal
Premium|Double Standard Food: एकाच कंपनीचे चिप्स आणि चॉकलेट भारतात घातक आणि परदेशात आरोग्यदायी.! असं का?
पुणे - तुम्ही चिप्स किंवा कॅटबरी खाताना कधी हा विचार केलाय का की, ही कॅटबरी किंवा हाच चिप्सचा पुडा अमेरिकेत किंवा युरोपामधील देशांमध्ये वेगळा आणि भारतात वेगळा का दिला जात असेल? सहसा सामान्य माणूस इतकी चिकित्सा करायला जात नाही. आपण ब्रँडवर विश्वास ठेवतो. कंपनी आंतरराष्ट्रीय आहे, म्हणजे ती दर्जेदारच असणार, हा आपला समज असतो. पण हेच ब्रँड्स दुहेरी निकष लावून भारतीयांच्या आरोग्याशी खेळत आहेत. यामध्ये कंपन्यांचा स्वार्थ आहे की त्यामगे काही नियम असतात. हे Double Standardization कशासाठी? ‘व्हेजिटेबल ऑईल’ च्या नावाखाली ज्यात त्यात ‘पाम ऑईल’ चा भडीमार केला जातो, जो शरिरासाठी अत्यंत घातक आहे. तसेच एडेड शुगर याच्या नावाखाली पदार्थामध्ये साखरेचा भरणा केला जातो. हे सगळं पोटात गेल्याने भारतातील नागरिकांमध्ये अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्यात हे अनेक संशोधनांनी सिद्ध केलंय.
पण सामान्य माणूस म्हणून माझ्या हातात काय आहे? तर पॅकेट फूडवरचा कंटेट वाचून विकत घेणे. पण तो वाचायचा कसा, शास्त्रीय नावे असणारे त्यातले कंटेट ओळखायचे कसे, त्याचं प्रमाण कसं लिहितात..? हे सगळं सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
