

Rupee to Dollar 90
esakal
पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या आकाराचं स्वप्न पुन्हा पुन्हा पुढं ढकलावं लागतं. रुपया नव्वदीपार होणं हा आर्थिक आघात आहेच, पण मानिसकदृष्ट्याही हा टप्पा धक्का देणारा म्हणूनच मागच्या वर्षात जवळपास पाच टक्क्यांनी रुपया घसरत असताना या घसरणीची चर्चा आता रुपया ९० वर गेल्यानंतरच सुरू झाली. या चर्चेचे दोन आयाम आहेत एक राजकीय, दुसरा अर्थशास्त्रीय. सरकारला या चर्चेपासून पळ काढता येणार नाही. त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत हेच खरे.