Premium|Iran US Israel war : इराणी नेतृत्वाला शांतता हवीय!

Middle East Conflict : इराण-इस्राईल युद्धाचा भडका: अमेरिकेचा हस्तक्षेप आणि जागतिक तणावाचा भारतासह इतर राष्ट्रांवर होणारा गंभीर परिणाम; इराणच्या महावाणिज्य दूतांनी स्पष्ट केली युद्धामागील रणनीती, तेल साठ्यांचे राष्ट्रीयीकरण आणि देशाच्या स्वसंरक्षणासाठी उचललेली कठोर लष्करी पावले.
Iran US Israel war

Iran US Israel war

esakal

Updated on

विनोद राऊत - rautvin@gmail.com

इराण आणि अमेरिका-इस्राईल युद्धामुळे जगभरात तणावाचे वातावरण अधिक गडद होत आहे. सततच्या भीषण हवाई हल्ल्यांनंतरही इराण माघार घेण्यास तयार नाही. गॅसच्या तुटवड्याची झळ अनेक देशांना बसली आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणचे महावाणिज्य दूत सईद रझा मोसायब मोतलाघ यांच्याशी संवाद साधून, युद्धामागील इराणची भूमिका, रणनीती आणि पुढील दिशा जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न...

सहा महिन्यांत इराणवर इस्राईल-अमेरिकेने केलेला हा दुसरा हल्ला आहे. या युद्धामागे अमेरिका-इस्राईलचा नेमका काय हेतू आहे, असे तुम्हाला वाटते?

इराणवर हे युद्ध लादले गेले आहे. इराणला खिळखिळे करण्याचा अमेरिकेचा हा पहिलाच प्रयत्न नाही. याचा मोठा इतिहास आहे. यापूर्वी त्यांनी इराणचे लोकप्रिय सरकार उलथवून लावले. त्यांचा ‘गुन्हा’ एवढाच होता, की त्यांनी इराणच्या राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले आणि तेल प्रकल्पांचे राष्ट्रीयीकरण केले. त्यामुळे अमेरिकेने कट रचून पंतप्रधानांना अटक केली आणि मोहम्मद रझा शाह पहलवी यांना सत्तेवर बसवले. यासंदर्भातील कागदपत्रे सीआयएने नुकतीच सार्वजनिक केली आहेत. १९७९ मध्ये इस्लामिक क्रांती झाली. त्यानंतरही शहा यांना पुन्हा सत्तेत बसवण्यासाठी अमेरिकेने अनेकदा अयशस्वी प्रयत्न केले. इराणवर आर्थिक निर्बंध लावून नाकेबंदी करण्यात आली. इराक-इराण युद्धादरम्यान इराकला मदत करून इराणला कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला. २०२५ मध्ये त्यांनी इराणवर हल्ला केला. इराणचे अस्तित्व नष्ट करण्याचा अमेरिकेचा हेतू उघड आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com