

Katkari tribe exploitation
esakal
गोबऱ्या गालांची, पिंगट केसांची आणि निरागस डोळ्यांची केवळ १३ वर्षांची दीपाली (नाव बदललं आहे) माझ्या प्रश्नांना एका शब्दात उत्तर देत होती. कातकऱ्यांना त्यांच्या भावना शब्दात मांडून त्या समोरच्यापर्यंत पोहोचवणं हे त्यांच्या बुजलेपणामुळे कायमच कठीण जातं. कातकरी समाजातल्या दीपालीची दारिद्र्यापोटी काहीएक हजारांना संगमनेरमधील बिन-आदिवासी मुलाला विक्री झाली. लग्नाची फक्त बोलणी करतो, असं सांगून फसवून दीपालीला आणि तिच्या आई-बाबांना संगमनेरला दलालामार्फत नेलं गेलं. मग तिथेच तिचं लग्नं लावून तिच्या आई-बाबांना पाठवून दिलं गेलं. दीपाली आक्रोश करीत राहिली; परंतु आधीच दारिद्र्याने पिचलेला तिचा बाबा रामदास (नाव बदललं आहे), तिला तिथेच ठेवून मुकाट माघारी परतला. ही घटना १६ ऑक्टोबर २०२५ ची म्हणजे दिवाळीच्या आसपासचीच...