

Naxalite surrender and rehabilitation programs
esakal
हुशार नेतृत्व, आक्रमक रणनीती, प्रेरणा आणि ठोस कृती यांद्वारे नक्षलवाद्यांविरोधातील निर्णायक यश मिळाले आहे. व्यापक विकासामुळे नक्षलवाद्यांच्या प्रभावाला ओहोटी लागली. जटिल भौगोलिक क्षेत्रात प्रशासन सुलभ झाले आहे. नक्षलवाद्यांच्या रक्तरंजित चळवळीचा अस्त हा केवळ शस्त्रांचा विजयच नाही, तर तो प्रभावशाली प्रशासनाचा तसेच सुसंगततेचा विजय आहे. यामुळे सामाजिक-आर्थिक एकात्मतेद्वारे व्यापक विकासासह सुरक्षा, अचूकता एकत्रित करून संघर्षाचे निराकरण कसे करता येते हा जागतिक अभ्यासाचा विषय ठरतो.