

Leopard Sterilization
esakal
‘महाराष्ट्रातील ग्रामीण भागात रहिवासी वस्त्यांवर बिबट्यांकडून हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले आहे. त्या धर्तीवर सरकारने घेतलेल्या निर्बीजीकरणाच्या निर्णयाचा वाईट परिणाम होणार नाही. उलट जंगलाबाहेर वाढलेल्या बिबट्यांची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे. सरकारने उचललेले पाऊल मानवी जीवनासाठी महत्त्वाचे आहे,’ असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला. भाजपचा शिवसेनेसोबत दुरावा नाही. राज्यात जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे युती धर्म पाळला जाईल, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी सुजित गायकवाड यांनी त्यांची घेतलेली मुलाखत...