Premium|Maharashtra Politics : नगरपरिषद निवडणुकीत सत्तेसाठी बेबनाव, घराणेशाही आणि पैशांची उधळपट्टी

Local body elections Maharashtra : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घराणेशाहीला बळ, पैशांचे वाटप, आमिषे, आचारसंहितेचे उल्लंघन आणि आरक्षण व प्रभागरचनेतील गोंधळामुळे निवडणुकीचे वेळापत्रक विस्कळित; साधनशूचिता हरवली.
Local body elections Maharashtra

Local body elections Maharashtra

esakal

Updated on

दीपा कदम

राज्यातील नगर परिषद, नगरपंचायतीच्या २६४ जागांसाठी २ डिसेंबरला मतदान पार पडले आहे. २० डिसेंबरला उर्वरित २४ नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी मतदान होणार आहे. दोन टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये यापूर्वी कदाचित एवढे नाट्य नसेल, जेवढे यावेळच्या निवडणुकांत पाहता आले. प्रचारादरम्यान एकीकडे सत्ताधाऱ्यांमधील बेबनाव, पैशांची आमिषे, निधीवाटपातील राजकीय हस्तक्षेपावर कोणताही विधिनिषेध न बाळगता जाहीर चर्चा झाल्याचे दिसले. या निवडणुकीत मंत्री, खासदार, आमदारांचे जवळचे नातलग निवडणुकीच्या रिंगणात उतरले, विरोधी पक्षांचे उमेदवार पळवले, महायुतीच्या घटक पक्षांचे महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत आघाडी झाली, उमेदवारी अर्ज जबरदस्ती मागे घ्यायला लावल्याचे आरोप झाले, अर्ज मागे घेण्याचा दबाव टाळण्यासाठी उमेदवार दुसऱ्या शहरांमध्ये लपून राहिले, उमेदवारांना मटण-दारू पार्टीच्या पुढे जाऊन मताला १० हजारांपासून २५ हजारांपर्यंत वाटले गेल्याचे आरोप झाले. हे नाट्य कमी की काय म्हणून मतदानाच्या ७२ तासांपूर्वी काही जागांवरच्या निवडणुका स्थगित झाल्या, त्यांच्यासाठी २० डिसेंबर रोजी मतदान पार पडते आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com