

New Income Tax Act 2026
esakal
डॉ. दिलीप सातभाई - dvsatbhaiandco@gmail.com
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केल्याप्रमाणे, एक एप्रिल २०२६ पासून नवा प्राप्तिकर कायदा लागू झाला आहे. जवळपास सहा दशकांपासून अस्तित्वात असलेला १९६१ चा प्राप्तिकर कायदा अनेक दुरुस्त्यांमुळे अत्यंत गुंतागुंतीचा झाला होता. या पार्श्वभूमीवर, सरकारने प्रक्रिया-सुलभता, डिजिटल प्रणालीचा वापर आणि अनुपालन या तीन प्रमुख तत्त्वांवर आधारित नवा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे.
हा बदल केवळ करदरांपुरता मर्यादित नसून, विविध मूलभूत बदल घडवून आणणारा आहे. नव्या प्राप्तिकर कायद्यात नवी करप्रणाली व जुनी करप्रणाली या संदर्भात स्पष्ट तरतुदी आहेत. याचा अर्थ दोन्ही प्रणाली नव्या कायद्यात कार्यरत राहणार आहेत व जुनी करप्रणाली रद्द होणार या अटकळीला पूर्णविराम देण्यात आला आहे. करदात्यांना दोन्हींपैकी कोणतीही (त्यांच्या फायद्याची) करप्रणाली निवडता येणार आहे.