Premium|NASA Artemis 2 mission : नासाची आर्टेमिस २ मोहीम यशस्वी; ओरायन यानाने अपोलो ८चा विक्रम मोडला, मानवाच्या नव्या चांद्रयुगाची मुहूर्तमेढ रोवली

Artemis 2 Record Flight : नासाच्या ‘आर्टेमिस २’ मोहिमेने रचला इतिहास! चार अंतराळवीरांनी पृथ्वीपासून ४,६०,००० किमी दूर जात प्रस्थापित केला नवा विक्रम. मानवाचा चंद्रावर पुनरागमनाचा मार्ग आता मोकळा झाला असून जागतिक अवकाश संशोधनात एका नव्या युगाची पहाट झाली आहे.
NASA Artemis 2 mission

NASA Artemis 2 mission

esakal

Updated on

डॉ. विनिता नवलकर- vinita.navalkar@gmail.com

नासाच्या महत्त्वाकांक्षी ‘आर्टेमिस २’ मोहिमेतील अंतराळवीरांनी अवकाशात पृथ्वीपासून सर्वाधिक दूर अंतरावर पोहोचण्याचा नवा विक्रम केला. ‘आर्टेमिस २’चे अंतराळवीर सध्या पृथ्वीपासून सर्वात दूर जाऊन आलेले पहिले मानव ठरले आहेत. या मोहिमेचा हा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यामुळे, आता मानवाचा चंद्रावर पुनरागमनाचा मार्ग पूर्णपणे खुला झाला आहे.

विज्ञानाच्या इतिहासात अवकाश संशोधन हे नेहमीच जिज्ञासा आणि साहस यांचे प्रतीक मानले गेले आहे. पृथ्वीच्या पलीकडे काय आहे, विश्वाची रचना कशी आहे आणि आपण या विशाल विश्वात किती लहान आहोत, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मानवाने अनेक दशकांपासून प्रयत्न केले आहेत.

आपल्या पृथ्वीचा सोबती आणि पृथ्वीच्या सर्वात जवळ असल्यामुळे चंद्र हा अवकाश संशोधनात कायमच केंद्रबिंदू ठरला आहे. विसाव्या शतकात अपोलो मोहिमांद्वारे मानवाने प्रथमच चंद्रावर पाऊल ठेवले आणि इतिहास घडवला; मात्र १९७२ मध्ये अपोलोच्या शेवटच्या मोहिमेनंतर, मानवाने पृथ्वीच्या निम्न कक्षेबाहेर जाण्याचा प्रयत्न केला नाही. मानवी मोहिमांमध्ये असलेली जोखीम, अतिरिक्त खर्च आणि रोबोटिक तंत्रज्ञानात होणारी सुधारणा याच कारणांमुळे मानवरहित मोहिमा हाती घेण्यात आल्या; मात्र आता जवळपास पन्नास वर्षांनंतर, नासाच्या ‘आर्टेमिस २’ मोहिमेद्वारे चार अंतराळवीर पुन्हा चंद्राच्या कक्षेत फिरून येत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com