

India-Bangladesh Relations
esakal
बांगलादेशाच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना तेथील लवादाने मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे. त्यातून बांगलादेश भारतासाठी किती धोकादायक वळणावर पोहोचला आहे, याचा प्रत्यय येतो. विशेषतः बांगलादेश पाकिस्तानकडे झुकू लागला असून, भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट डोकेदुखी ठरणार आहे.
बांगलादेशमध्ये ऑगस्ट २०२४मध्ये झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना अचानक पद सोडून देश सोडावा लागला. त्यानंतर तेथे निर्माण झालेली परिस्थिती राजकीय त्सुनामीसारखी होती आणि त्यातून दक्षिण आशियाच्या सामरिक नकाशावर भूकंप घडवला आहे. शेख हसीना यांना पद सोडावे लागणे, हे भारत आणि दक्षिण आशियाच्या सामरिक दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाची आहे.