

Parliament Winter Session 2025
esakal
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी मजेत आणि विरोधक त्रस्त, असे चित्र दिसणार आहे. मोदी सरकारला घेरण्यासाठी नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांपुढे अनेक मुद्यांनी भरलेले ताट वाढून ठेवलेले आहे. बारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संपत आलेली मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (एसआयआर) प्रक्रिया, या प्रक्रियेच्या दबावाखाली विविध राज्यांमध्ये ‘बीएलओं’नी केलेली आत्महत्या, चार नव्या कामगार संहितांची अंमलबजावणी, हवेची गुणवत्ता ढासळून राजधानी दिल्लीचे झालेले गॅस चेंबर, बिहारसह विविध भाजपशासित राज्यात सुरु झालेले बुलडोझरपर्व, संसदेत ''वंदे मातरम्’ उच्चारण्यास केलेला मज्जाव, अरुणाचल प्रदेशावर चीनने केलेला दावा, लाल किल्ल्यापाशी झालेला १० नोव्हेंबरचा आत्मघातकी कारबॉम्ब स्फोट, १३१ वी घटनादुरुस्ती करुन केंद्रशासित चंडीगडमध्ये उपराज्यपालांची नियुक्ती करुन प्रशासक नेमण्याचा प्रस्ताव, झुंडीकडून होणाऱ्या हत्येच्या घटनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस उपायुक्तांकडून घ्यावी लागणारी परवानगी, असे अनेक चमचमीत मुद्दे विरोधी पक्षांपुढे असतील.