MInimalism
Esakal
पुणे - जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन हे अतिशय साधे जीवन जगत होते. त्यांनी एकाच प्रकारचे अनेक सूट विकत घेतले होते जेणेकरून त्यांना रोज अंगात घालण्यासाठी काय निवडावे याचा विचार करावा लागू नये. केवळ अल्बर्ट आइनस्टाईनच नाही तर महात्मा गांधी, स्टीव जॉब्स, वॉरन बफे असे अनेक जण हे कोट्याधीश असूनही साधी जीवनशैली जगत होते.
आजच्या चंगळवादी युगात जास्तीत जास्त जमवण्याकडे लक्ष असते, पण आधुनिक मानसशास्त्रीय संशोधने मात्र काहीतरी वेगळंच सांगत आहेत. मी रोज काय घालावे यासाठी मी माझी ऊर्जा खर्च करू इच्छित नाही असे सांगत अनेक जण कमीत कमी वस्तूंचा वापर करत आपले रोजचे आयुष्य जगतात. ‘मिनिमलिझम’ ही संकल्पना तेच सांगते. ‘मिनिमलिझम’ म्हणजे केवळ वस्तू कमी करणे नव्हे, तर आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी खरोखर मोलाच्या आहेत, त्यांच्यासाठी जागा निर्माण करणे होय. मिनिमलिझम हे एक प्रकारचे 'मानसशास्त्रीय स्वातंत्र्य' आहे.
हे बोलायला जरी सोपं वाटत असलं तरी आपला जीव अनेकदा अनेक वस्तूंमध्ये अडकलेला असतो. अशा वेळ खरंच कमी वस्तुंमध्ये समृद्ध आयुष्य जगता येते का? मानसशास्त्रात या विषयी काय म्हंटले आहे, ‘मिनिमलिझम’ म्हणजे अल्पसंतुष्ट असणे आहे का? आणि असे करण्याने आयुष्यात कमी ताण किंवा कमी त्रास होतो का? याविषयीची संशोधने काय सांगतात हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ या विशेष लेखातून.