Premium|Epstein Files : एपस्टीन फाइल्स... कोण जात्यात, कोण सुपात?

Jeffrey Epstein Scandal : जेफ्री एपस्टीनच्या हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटमधील गोपनीय कागदपत्रे उघड झाल्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांपासून ते ब्रिटिश राजघराण्यापर्यंत आणि जागतिक प्रभावशाली व्यक्तींच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
Epstein Files

Epstein Files

esakal

Updated on

पूनम शर्मा-editor@globalstratview.com

‘एपस्टीन फाइल्स’ने सध्या संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. जेफ्री एपस्टीनद्वारे समोर आलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून जगभरातील राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान व उद्योगपती ते विविध क्षेत्रांतील प्रभावी लोकांची नावे आहेत. त्यात भारतातील काही केंद्रीय मंत्री, खासदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एपस्टीन फाइल्सचे राजकारणावर दूरगामी परिणाम होणार असल्याचे सांगून खळबळ उडवली आहे. अमेरिकेतील संसदेत या फाइल्स आता खुल्या करण्यात आल्या आहेत. ‘एपस्टीन फाइल्स’चा जागतिक परिणाम काय होईल, हे समजून घेणे गरजेचे आहे.

ल्लीच्या इतिहासात जेफ्री एपस्टीनप्रमाणे फारच थोड्या गुन्हेगारी प्रकरणांचा मोठा प्रभाव पडला आहे. त्याची संपत्ती आणि त्याचे प्रभावशाली संबंध यापलीकडेही जाऊन त्याला संस्थांनी कसे संरक्षण दिले, बळी पडलेल्यांचा आवाज कसा बंद करण्यात आला आणि त्याच्या चुकांवर उच्चभ्रू वर्तुळातून कसे पांघरूण घालण्यात आले, यातून यंत्रणेचे अपयश दिसते. आता यातील कागदपत्रे उघड होत असताना उत्तरदायित्व, हक्क आणि न्याय यासंदर्भात सार्वजनिक माहिती प्रक्रियेमध्ये बदलही होत आहे; मात्र जेफ्री एपस्टीन कोण होता, त्याचे गुन्हे कसे होते, एपस्टीन फाइल्स काय होत्या, अमेरिकी काँग्रेसच्या कारवाईचा विचार करता त्याच्या प्रकरणांचा अमेरिका आणि जगावर, त्यातही ट्रम्प यांच्या धोरणांवर आणि ब्रिटिश राजघराण्यावर काय परिणाम झाला, हे समजून घेण्यासारखे आहे.

न्यूयॉर्कमध्ये १९५३ मध्ये जन्मलेल्या जेफ्री एपस्टीन याला न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवी घेता आली नाही; पण मॅनहटनमधील प्रसिद्ध डेल्टन शाळेत शिकल्यामुळे बड्या कुटुंबांशी त्यांचे संबंध जोडले गेले. त्याच्या नंतरच्या आयुष्यात ते महत्त्वाचे ठरले. एपस्टीनने १९८२ मध्ये जे. एपस्टीन अँड कंपनी हा स्वतःचा आर्थिक व्यवसाय सुरू केला. यातून तो अब्जाधीशांच्या संपत्तीचे व्यवस्थापन केल्याचा दावा करीत असे. त्याचे आर्थिक व्यवहार अपारदर्शक होते आणि त्याची संपत्तीनिर्मिती कशी झाली, हे फार कोणाला ठाऊक नव्हते; मात्र त्याची खासगी विमाने, अवाढव्य जमिनी, उच्चभ्रू वर्तुळातील दोस्त यातून त्याचा प्रभाव सहज दिसत असे. त्यानंतर एपस्टीनने अनेक वर्षे शैक्षणिक, व्यावसायिक आणि श्रीमंत वर्तुळातील व्यक्तींचे जाळे तयार केले; मात्र त्याच्या चकचकीत प्रतिमेमागे एक काळाकुट्ट चेहराही दडला होता. त्याच्यावर अनेक अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता.

Epstein Files
Premium|Third World Countries : 'तिसरे जग' म्हणजे नक्की काय? ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे जुनी संकल्पना पुन्हा जागतिक चर्चेत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com