

Civil services exam material
esakal
आज आमच्यासाठी एक विशेष क्षण आहे. आमच्या साप्ताहिक डिजिटल पेपरच्या २५व्या आवृत्तीचा. हा उपक्रम म्हणजे सकाळ मीडिया ग्रुप आणि ज्ञानदीप अकॅडमी, पुणे यांची एकत्रित सामाजिक जबाबदारीची वाटचाल. केवळ सहा महिन्यांत हा पेपर महाराष्ट्रभरातील हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. साताऱ्याच्या डोंगरांपासून नागपूरच्या गल्ल्यांपर्यंत, कोकणच्या किनाऱ्यांपासून नंदुरबारच्या आदिवासी शाळांपर्यंत. प्रत्येक आठवड्याला आम्ही एकच संदेश पोहोचवत आलो आहोत. भाषा, ठिकाण किंवा साधनं काहीही असो, प्रत्येक विद्यार्थ्याला मोठं स्वप्न बघायचा आणि ते पूर्ण करायचा अधिकार आहे.