

Importance of saree pallu
esakal
साडी पसंत पडली, तरी पदर आवडल्याशिवाय काही साडीखरेदी होत नाही. मौल्यवान साडी असेल तर पदराला नेट लावून पदराची जपणूक करायची नवीन प्रथा रूढ होऊ पाहत आहे. म्हणजेच, भावनिक गुंतवणुकीबरोबरच हल्ली आर्थिक गुंतवणूकपण वाढत आहे पदराची! साडी साधी असली तरी चालेल, पण पदर मात्र त्या साडीला शोभेलसा कलात्मक हवा, अशीच प्रत्येक महिलेची अपेक्षा असते.
आईच्या पदराआडून डोकावत आपण पहिल्यांदा जगाच्या नजरेला नजर भिडवतो...एक घाबरलेली, भेदरलेली किंचितशी बावरलेली अशी ती एक निष्पाप नजर, त्या पदराआडची! त्या पदराने आपल्याला जगाशी दोन हात करायची हिंमत दिलेली असते. एक तलम, नाजूकसा असा तो पदर, पण त्याची ताकद एखाद्या पाषाणासारखी! या पदराआड बालकाला प्रेम, आपलेपणा आणि धाडस गवसते.