

Siddhapeeth Minimum Wage Dispute
esakal
सिद्धपीठातील कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी आम्ही लढत होतो. सिद्धपीठ मात्र आमची मागणी काही केल्या मान्य करीत नव्हतं. मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतरही सिद्धपीठ तयार नव्हतं. मग आम्ही आंदोलनाची नवी रणनीती आखली. लढा जिंकायला आंदोलनाच्या रणनीतीसोबतच कायद्याचं ज्ञान असणं आवश्यक असतं... तरच अहिंसक संघर्षाची रणनीती आखता येते आणि यशस्वीही करता येते.
‘दहा लाख रुपये दिले नाहीत आणि भ्रष्ट आहेत’ असं म्हटल्यानंतर शांत बसलेले भास्करराव पाटील चिडून जागेवरून उठले. मुख्यमंत्र्यांसमोर केलेल्या या आरोपांमुळे ते रागाने अत्यंत लालेलाल झाले होते. त्यांनी थॉमस कुरुलांची गचांडीच पकडली.