Premium| Lactose tolerance: लॅक्टोज टॉलरन्सची मानवी कथा : उत्क्रांती आणि संस्कृतीचा संगम

Human evolution and milk digestion: दूध पचवण्याची मानवी क्षमता ही केवळ जैविक नव्हे तर सांस्कृतिक उत्क्रांतीची देणगी आहे. या प्रक्रियेत माणसाने स्वतःमध्ये बदल करून पर्यावरणाशी एकरूपता साधली
 Lactose tolerance

Lactose tolerance

esakal

Updated on

समोर येईल त्या परिस्थितीशी जुळवून घेत माणूस आजवर स्वतःचा प्रवास करत राहिला आहे. आज ज्या गोष्टी आपल्याला अगदी सहज सोप्या वाटतात, त्या कधी काळी माणसाकरिता नवीन होत्या; पण परिस्थितीशी हातमिळवणी करून वातावरणाशी एकरूप होण्याचा माणसाचा स्वभाव राहिला आहे. माणूस आजही आपल्या या स्वभावाशी प्रामाणिक आहे. तो आजही स्वतःवर प्रयोग करतो. येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जातो. त्यानुसार तो स्वतःच्या आयुष्यात बदल घडवून आणतो. त्यामुळेच तो वातावरणाशी एकरूप होऊन जगू शकतोय. मानवी उत्क्रांतीच्या प्रवासातील अनेक टप्पे आपण आजवर पाहिले. त्यातील प्रत्येक टप्प्यात माणसाने स्वतःचे जगणे समृद्ध करण्यासाठी अनेक वेळा स्वतःमध्ये बदल करून घेतले, नवे शोध लावले आणि त्यामुळे त्याचे जगणे सुकर होऊ शकले.

आज अगदी सामान्य वाटणाऱ्या गोष्टीदेखील पूर्वी माणसासाठी तेवढ्या सोप्या नव्हत्या. आज जे अन्न आपण अत्यंत नैसर्गिक अन्नात स्रोत म्हणून वापरात घेतो ते अन्नदेखील माणूस पचवू शकत नव्हता, असे तुम्हाला सांगितले तर खरे वाटणार नाही. पूर्वी माणसाला दूधदेखील पचत नव्हते. कारण ते पचवण्यासाठी लागणारे घटक माणसाच्या शरीरात नव्हते. माणसाच्या या दूध पचवण्याची गोष्टी ‘लॅक्टोज टॉलरन्सची मानवी कथा’ म्हणून ओळखली जाते. ही गोष्ट जैविक उत्क्रांती आणि सांस्कृतिक बदलांचा एक अनोखा संगम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com