

Healthcare Management Information System
esakal
युगांक गोयल- प्राध्यापक, फ्लेम विद्यापीठ, तसेच विद्यापीठाच्या www.indiandistricts.in चे संस्थापक
कृती भार्गव- विद्यार्थिनी
महाराष्ट्रातील रुग्णांना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थे अंतर्गत सेवा कशी मिळते अन् सरतेशेवटी त्यांना कोणते उपचार मिळतात, याचा ‘आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली’ या स्रोताच्या आधारे जिल्हा प्रकल्पांद्वारे (indiandistricts.in) जिल्हानिहाय माहितीचा दोन निर्देशकांद्वारे आम्ही अभ्यास केला. हे निर्देशक राज्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांची कार्यक्षमतेबाबत सुस्पष्ट माहिती देतात.
या दोन निर्देशकांतून आपल्याला सार्वजनिक आरोग्यसेवेचा वापर, वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया, रुग्णांची उपचाराभिमुखता अन् महाराष्ट्रातील विविध पातळ्यांवरील आरोग्य संस्थांवर पडणाऱ्या ताणाबद्दल अधिक सखोल माहिती मिळते.