

Passive Euthanasia India
esakal
डॉ. अविनाश भोंडवे - avinash.bhondwe@gmail.com
‘जगण्याचा अधिकार हा मानवाचा मूलभूत हक्क असतो, पण हा अधिकार सन्मानाने जगण्यासाठी असतो. जेव्हा हा सन्मानच उरत नाही, तेव्हा मरण्याचा अधिकारही तितकाच महत्त्वाचा ठरतो.’ हा प्रश्न कायदा, विज्ञान, नीतिशास्त्र आणि करुणा यांच्या संगमावर अधिष्ठित असतो. दि. ११ मार्च २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने हरीश राणा या तरुणाच्या निष्क्रिय इच्छामरणाला परवानगी दिली आणि हा संवेदनशील विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. या पार्श्वभूमीवर इच्छामरण, लिव्हिंग विल आणि याबाबतचे भारतातील कायदे आज प्रत्येक सुजाण नागरिकाला माहिती असणे आवश्यक ठरते.