

Aravalli mining controversy
esakal
निसर्गाचे मूल्य आकडेवारीत किंवा उंचीमध्ये मोजता येत नाही, यात शंका नाही. अरावलीच्या संरक्षणासाठी इथे हजारो वर्षं वास्तव्य असलेल्या स्थानिकांच्या संमतीने आणि शास्त्रीय संशोधनाचा आधार घेऊन आराखडा करायला हवा.
भारताच्या उत्तर भागात वसलेली अरावली (पर्वतरांग) सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. गुजरातपासून राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत सुमारे ७०० किलोमीटर पसरलेले हे पर्वत उत्तर भारताची जीवनवाहिनी आहेत. पृथ्वीवरील सर्वात प्राचीन पर्वतरांगांपैकी असलेल्या अरावलीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने देशभरात गदारोळ चालू आहे. या वादाचे अनेक पैलू आहेत, ते म्हणजे पर्यावरण, कायदा, अर्थकारण आणि स्थानिक लोकांचे भवितव्य.