

Kerala three-cornered contest
esakal
परिमल माया सुधाकर, सहयोगी प्राध्यापक, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट
तिरुवनंतपुरममधील त्रि-ध्रुवीय लढतीचा थोडा जरी प्रभाव राज्याच्या उर्वरित भागांवर पडला असेल, तर केरळमने इतिहासातील सर्वांत अनपेक्षित निवडणूक निकालासाठी मतदान केले आहे, असे म्हणता येईल.
केरळमची राजधानी तिरुवनंतपुरममधील विधानसभा मतदारसंघात यावेळी कमालीची राजकीय चुरस होती. येथील प्रचाराच्या दिशा सुस्पष्ट; पण परस्परविरोधी स्वरूपाच्या होत्या. काही महिन्यांपूर्वीच भाजपने शहराच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये दमदार विजय मिळवला होता, तर त्याच वेळी कॉंग्रेसच्या नेतृत्वातील ‘युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट’ (यूडीएफ) ने राज्यात इतरत्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुसंडी मारली होती. त्यामुळे, ‘लेफ्ट डेमॉक्रॅटिक फ्रंट’ (एलडीएफ) सरकारच्या विरोधातील हे दोन्ही पक्ष ओतप्रोत उत्साहाने प्रचारात उतरले होते. विशेषत: भाजपने निवडणुकीत ‘टाइम-पास करणारा पक्ष’ ही प्रतिमा तिरुवनंतपुरममध्ये पुसून टाकली आहे.