China’s Economic Rise
डॉ. अनिल पडोशी, अर्थशास्त्राचे प्राध्यापक
चीनने आपल्या स्वत:च्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एक लाख कोटी डॉलर इतका फायदा कमावला. चीनच्या आर्थिक क्षेत्रातील या अभूतपूर्व यशामुळे समस्त जग अचंबित झाले. चीनच्या कामगिरीबद्दल एक प्रकारच्या कौतुकादराची भावना व्यक्त झाली. भारताने आर्थिक कामगिरी सुधारण्यासाठी चीनकडून शिकण्यासारखे आहे, असेही सांगितले गेले. परंतु चीनने हे अपूर्व यश कसे मिळविले, ते नीट पाहायला हवे.