

US China Trade Tension
esakal
दक्षिण कोरियात झालेल्या ट्रम्प-जिनपिंग भेटीचे नाट्य संपले, पण कथानक तिथेच राहिले. ना करार, ना समाधान; फक्त गाजावाजा आणि धुरळा. चीनने धोबीपछाड डाव टाकत ट्रम्प यांना चीतपट केले, मात्र ट्रम्प आपणच विजयी ठरल्याचा भास निर्माण करण्यात यशस्वी ठरले..
अपेक्षेचा थरार नेहमी वास्तवावर वरचढ ठरतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग यांच्या बहुप्रतिक्षित, पण फुसक्या ठरलेल्या भेटीनंतर हे प्रकर्षाने जाणवले. सगळ्या जगाची नजर खिळलेली ही भेट ट्रम्प यांच्या चीनविषयक धोरणाची आणि ‘आयात शुल्क’ राजकारणाची जाहीर पराभवघंटा ठरली. जगातील दोन महासत्तांच्या वाढत्या व्यापारतणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते दक्षिण कोरियातील बुसान विमानतळावरच्या एका छोट्याशा इमारतीत २०१९ नंतर पहिल्यांदाच आमनेसामने आले.