
डॉ. अमिताभ सिंग
samitabh@gmail.com
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांचा युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी झालेला संवाद दोन सार्वभौम देशांच्या अध्यक्षांमधील होता, असे म्हणताच येणार नाही. दोन गटांत कॅमेऱ्यासमोर झालेली शाब्दिक चकमक अवघ्या जगाने पाहिली. एक गोष्ट स्पष्ट आहे ती म्हणजे, ट्रान्सॲटलांटिक संबंधांत मिठाचा खडा पडला आहे आणि यापुढे ते कधीच पूर्वीसारखे होणार नाहीत. युक्रेन युद्ध अन् युरोपचे अध:पतन सुरू आहे. युरोपला आता नव्या वास्तवाचा आपल्या हिमतीवर सामना करण्याशिवाय गत्यंतर नाही.