AI Detective
esakal
Premium|AI Detective : तुम्हीही आहात का, एआय डिटेक्टिव्ह ?
ब्रिजेश सिंह - brijeshbsingh@gmail.com
इंटरनेटने आपल्याला वचन दिले होते, की ते जगाला जवळ आणेल, माहिती सोपी करेल; पण आज उलट झाले आहे. आज आपल्या माथी एक नवीन पद मारले गेले आहे - ‘एआय डिटेक्टिव्ह’ किंवा ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा गुप्तहेर’. ही अशी पदवी आहे जी कोणालाच नको होती; पण ती टाळताही येत नाही.
चक्रव्यूहात अडकलेल्या भारतीय ‘एआय डिटेक्टिव्ह’चा शेवट काय? आपण तंत्रज्ञानावर बंदी घालू शकत नाही; कारण बाण हातातून सुटला आहे आणि एआय आता आपल्या आयुष्याचा भाग बनले आहे; पण आपण हे ‘विनापगारी काम’ सामान्य मानण्याचे नाकारू शकतो.
म्ही या नोकरीसाठी कधी अर्ज केला होता का? नक्कीच नाही. कोणाशी पगार ठरवला होता? नाही. तरीही, आज ज्या ज्या भारतीयाच्या हातात स्मार्टफोन आहे, तो ही नोकरी करतोय. दिवसरात्र, अगदी प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही फोनची स्क्रीन अनलॉक करता तेव्हा तुमची ‘शिफ्ट’ सुरू होते. तुमचे ऑफिस म्हणजे काही मुंबई-पुण्यातील एसी केबिन नाही; तर तळहातावर मावणारा तुमचा मोबाईल आहे आणि काम काय? तर डिजिटल जगात सतत कोसळणाऱ्या माहितीच्या महापुरातून ‘सत्या’चा सुईच्या टोकाएवढा कण शोधून काढणे.

