Premium|US Foreign Policy Impact : जगाच्या पाठीवर: अविश्वासाच्या अडकित्त्यातील शस्त्रसंधी!

Hormuz Strait Conflict Projects : इराण आणि अमेरिका-इस्राईल संघर्षाने जागतिक इंधन बाजारात मोठी खळबळ उडवून दिली असून, 'प्रोजेक्ट फ्रीडम' मोहिमेमुळे आखातात निर्माण झालेल्या तणावामुळे श्रीलंका, नायजेरिया आणि युरोपातील अनेक देशांत महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून भारताने मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.
Hormuz Strait Conflict Projects

Hormuz Strait Conflict Projects

esakal

Updated on

विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार

इराणने संयुक्त अरब अमिरातीवर नव्याने हल्ले सुरू केले आहेत आणि या आक्रमकतेच्या मुळाशी आहे ती अमेरिकेची ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ या मोहिमेखालील होर्मुझमुक्तीसाठीची चढाई! अमेरिका-इस्राईल विरुद्ध इराण असा सशस्त्र संघर्ष सुरू होऊन आता नऊ आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटला असला आणि मधूनमधून युद्धविरामाची चर्चाही होत असली तरी या संघर्षाला परिणामकारक पूर्णविराम कधी मिळणार ते अद्याप कोणालाही स्पष्ट नाही. त्यामुळेच काही अभ्यासकांनी या स्थितीचे वर्णन ‘गोठलेला संघर्ष’ असे केले आहे.

या संघर्षाचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम चिंताजनक आहेत. आपल्या शेजारच्या श्रीलंकेत पेट्रोलियम पदार्थांची भाववाढ तर झाली आहेच; पण सरकारने त्यांचे रेशनिंगदेखील सुरू केले आहे. खते, औषधे, वाहतूकव्यवस्था अशा अनेक वस्तू आणि सेवांना या महागाईचा फटका बसला आहे. तिकडे मेक्सिकोत सरकारने पेट्रोलियम पदार्थांसाठी मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली आहे; पण तरीही भाववाढ सुरूच आहे. चिकन, अंडी इत्यादीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. टोमॅटोचे भाव दुपटीने तर मिरच्यांचे भाव दीडपटीने वाढले आहेत. यावर उतारा म्हणून सरकारने ‘टॉर्टीला’सारख्या पदार्थांचे भाव नियंत्रित केले आहेत. अनेक देशांत खताचे भाव वाढल्याने मक्यासारखी अन्नधान्येही महाग झाली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com