

US Government Shutdown
esakal
जगातील सर्वाधिक श्रीमंत देश असलेल्या अमेरिकेत आज एक विचित्र आणि अभूतपूर्व संकट उभं राहिलं आहे. सरकार आणि काँग्रेसमधील मतभेदांमुळे १४ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी अनेक आठवड्यांपासून पगाराची वाट पाहत आहेत. ज्यांचं पोट हातावर आहे त्या गरीब कर्मचाऱ्यांना फूड डिलिव्हरी, पाळीव प्राणी फिरवणे, विविध वस्तूंची विक्री करणे असे साइड जॉब्स करावे लागत आहेत. हातात पगार नसल्याने जगातील सर्वात श्रीमंत देशाचा नागरिक भाडं भरायचं की किराणा भरायचा अशा द्वंद्वात फसला आहे. कहर म्हणजे जगातील सर्वाधीक शक्तीशाली संरक्षण व्यवस्थेतील सैनिकांच्या कुटुंबांना अन्नधान्य वितरण केंद्रांचा आधार घ्यावा लागत आहे.
ही परिस्थिती एवढी चिघळली आहे की, विमानतळांवरील सुरक्षा तपासणी थांबली आहे, गरीब मुलांचं मोफत शिक्षण आणि पोषणाची योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि आरोग्यसेवा प्रणाली तर अर्धवट क्षमतेने चालू आहे.
ही परिस्थिती केवळ आर्थिक अस्थिरता नाही, तर लोकशाहीवरील विश्वास, जवाबदारी आणि राजकीय प्रामाणिकपणा संबंधी प्रश्न निर्माण करणारी आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देशातील नागरिकांना आज ‘माझ्या पगारासाठी जबाबदार कोण?’ असा प्रश्न पडतोय, तर गुंतवणूकदार आणि जागतिक बाजारपेठ या सगळ्याकडे गंभीर चिंतेच्या दृष्टीने पाहत आहे.
ही अवस्था पाहिल्यावर असा प्रश्न पडतो की, श्रीमंती, तंत्रज्ञान आणि सामर्थ्याच्या शिखरावर असलेली अमेरिका आज इतक्या अस्थिर अवस्थेत कशी पोहोचली? सरकार आणि काँग्रेसमधील संघर्ष इतका तीव्र कसा झाला की देशाचा कारभारच ठप्प व्हावा? या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घ्या सकाळ+च्या या लेखातून.