

Corporal Punishment In Schools
esakal
उठाबशांच्या शिक्षेमुळे सहावीच्या मुलीचा नुकताच मृत्यू झाला. पालघरमधील एका घटनेत शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून शालेय मुले जंगलात लपून राहिली... शिक्षण पद्धती, शिस्तीचे प्रकार, शिक्षक-विद्यार्थी संबंध आणि मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत अनेक गंभीर प्रश्न उभे करणाऱ्या अशा घटना संपूर्ण शिक्षणयंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. शाळेत शिक्षकांकडे निर्णायक सत्ता असते. जेव्हा शिक्षा ‘शारीरिक दडपशाही’च्या रूपात होते, तेव्हा ती सत्तेचा गैरवापर ठरते.
शारीरिक शिक्षा कठोर असली, की ती मृत्यूच्या टप्प्यावर पोहोचू शकते हे वसईतील विद्यार्थिनीच्या मृत्यूने सिद्ध झाले आहे. कठोर शिक्षा मानसिक स्तरावरही खोल जखम करून विद्यार्थ्यांमध्ये टॉक्सिक शेम निर्माण करते.