

Iceland Vatnajökull glacier floods
esakal
उमेश झिरपे - umzirpe@gmail.com
हिमनदीखालून अचानक येणारा प्रचंड पूर. या पूराचा वेग आणि प्रमाण इतकं मोठं असतं की काही तासांत भूभाग बदलू शकतो. रस्ते, पूल आणि संपूर्ण दऱ्या या पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाऊ शकतात. ही हिमनदी केवळ बर्फाचा साठा नसून तिच्या खाली सक्रिय ज्वालामुखी, लाव्हा प्रवाहांचे अवशेष आणि गरम पाण्याच्या स्रोतांचे जाळे पसरलेले आहे. काही ठिकाणी या उष्ण स्रोतांमुळे बर्फाच्या तळाशी सतत वितळणं चालू असतं. परिणामी हिमनदीच्या खाली पाण्याचे साठे तयार होतात. हे साठे काही काळ स्थिर राहतात, पण दाब वाढला की अचानक बाहेर पडतात आणि प्रचंड पूर निर्माण करतात.
हिमनदी म्हटलं की आपल्या मनात एक ठराविक प्रतिमा उभी राहते, शांत, शुभ्र पांढरी, संथ वाहणारी बर्फाची नदी. पण पृथ्वीवर काही ठिकाणी हिमनद्या या कल्पनेपलीकडे जातात. त्या केवळ बर्फ नसतात, तर त्या अग्नी आणि बर्फ यांच्या संघर्षातून तयार झालेल्या जिवंत प्रणाली असतात. आइसलँडमधील वत्नायोकुल हिमनदी ही अशीच एक विलक्षण रचना आहे. जिथे बर्फाच्या थराखाली ज्वालामुखी धगधगत असतात.