Premium|Marathi Theater and Society : नाटक कुठंही घडू शकतं; मराठी रंगभूमीची अनोखी जादू

Power of Live Performance : नाटकाचा उगम लोकरंगभूमीतून झाला असून, आजच्या डिजिटल युगातही नाटक हे सामाजिक परिवर्तनाचे आणि मानवी जाणिवा समृद्ध करणारे एक अत्यंत जिवंत आणि प्रभावी माध्यम आहे.
Marathi Theater and Society

Marathi Theater and Society

esakal

Updated on

आशुतोष पोतदार

काही वेळापूर्वी रिकामं असलेलं नाट्यगृह आता भरून गेलंय. प्रेक्षक स्थानापन्न होतायत. बघता बघता अंधार होतो. काही क्षणांत समोरचा अवकाश उजळणार असतो. नेहमीच्या जगण्यातली तीच ती रखरख, मनाला टोचणाऱ्या अपयशाच्या कहाण्या आणि अस्वस्थ करणारे विचार आपण बासनात गुंडाळून ठेवतो आणि वाट पाहू लागतो रंगमंच उजळून टाकणाऱ्या त्या ‘मॅजिक’ची! अखेरीस तो क्षण अवतरतो. काही वेळापूर्वी इथं काही नव्हतं. आणि आता रंगमंचावर हालचाली दिसू लागतात. कानावर आवाज पडू लागतात. नेहमीचं जग समोर दिसू लागतं; पण तरीही ते वेगळं वाटतं. संत रामदास महाराज लिहितात त्याप्रमाणे, हे ‘अवकाश घन पोकळ । गगनाऐसें’ बनते. आपण ते ध्यान देऊन ऐकू लागतो, त्याकडे पाहू लागतो. नाटकाचा खेळ सुरू होतो. विश्‍वविख्यात नाट्यदिग्दर्शक पीटर ब्रुक म्हणतात, की ‘‘कोणत्याही मोकळ्या जागी एक व्यक्ती चालत जाते आणि दुसरी व्यक्ती त्याकडे पाहू लागली की नाटक घडते. त्या रिक्त, पोकळ जागेवर साकार होणाऱ्या नाट्यातून ‘गगनाऐसें’ घन अवकाशाची प्रचिती येते. तसेच, याच नाट्यातून अणुरेणू एवढ्या वाटणाऱ्या जीवनातील फल-विफलतेचाही साक्षात्कार आपल्याला होऊ शकतो.’’

Marathi Theater and Society
Premium| Generative AI: कला क्षेत्रात जनरेटिव्ह एआयमुळे नवा गोंधळ निर्माण झाला आहे. माणूस आणि यंत्रातील सीमारेषा धूसर होत चालल्या आहेत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com