

Bangalore drug trafficking case study
esakal
तुम्ही बंगलोरमधील नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहात. अलीकडच्या काही वर्षांत, काही आफ्रिकन नागरिकांकडून होणारे ड्रग्ज तस्करी हे शहरासाठी मोठे संकट ठरले आहे. गुप्तचर अहवालानुसार, हे अवैध ड्रग्ज विकणे उच्च शिक्षण संस्थांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चालते. मात्र, निरीक्षणानुसार फक्त मोजकेच आफ्रिकन नागरिक या गुन्ह्यामध्ये सामील आहेत व बहुतांश शांततेत जीवन जगतात. कडक कायदेशीर उपाय असतानाही शहरातील ड्रग्ज विक्री व वापरात वाढ होत आहे. एनसीबीने नुकत्याच केलेल्या तपासात असे आढळले आहे की, स्थानिक पोलीस, स्थानिक प्रतिनिधी (कॉर्पोरेटर्स) आणि व्यापारी यांनी काही आफ्रिकन नागरिकांच्या मदतीने ड्रग्ज विक्रेत्यांचे गुंतागुंतीचे जाळे निर्माण केले आहे. अलीकडील काही वर्णद्वेषी हल्ल्यांमुळे, केंद्र व राज्य सरकारने सर्व पोलीस ठाण्यांना निर्देश दिले आहेत की कुठल्याही आफ्रिकन नागरिकास वाईट वागणूक देऊ नये आणि सर्व प्रकारे त्यांचे संरक्षण करावे. या पार्श्वभूमीवर वाढणारे ड्रग्जचा गैरवापर नियंत्रणात आणावा व जेथून तस्करी होते तेथील स्त्रोतावर कारवाई करावी असे वरिष्ठांनी सांगितले आहे