

Sahir Ek Shabd Garud
esakal
सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार साहिर लुधियानवी यांच्या अनेक गीतांचे अप्रतिम रसग्रहण असलेले पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. ‘साहिर... एक शब्द गारुड’ असे या पुस्तकाचे नाव. साहिर यांच्या वैयक्तिक आयुष्यात न डोकावता त्यांच्या विविध प्रकारच्या गाण्यांमधून व्यक्त झालेले विचार त्यात वाचायला मिळतात.
सुप्रसिद्ध कवी आणि हिंदी चित्रपट गीतकार साहिर लुधियानवी हे नाव समोर आले, की ‘कभी कभी मेरे दिल में’, ‘मैं पल दो पल का शायर हू’, ‘अभी ना जाओ छोडकर’, ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ आदी अनेक गाणी मनात रुंजी घालू लागतात. ‘ये दुनिया अगर मिल भी जाये’, ‘तू हिंदू बनेगा’, ‘औरत ने जनम दिया’ या गाण्यांचा उल्लेख टाळून लेखाला सुरुवात करणे अशक्यच.
काही व्यक्ती वयाने, कर्तृत्वाने कितीही मोठ्या असल्या तरी त्यांच्यावरील आदरभाव-प्रेम हे त्यांचा उल्लेख एकेरी करूनच व्यक्त करता येतो. अशांपैकीच एक आहेत, साहिर. त्यांच्या अनेक गीतांचे अप्रतिम रसग्रहण केलेले पुस्तक म्हणजे, ‘साहिर... एक शब्द गारुड.’ लेखिका आहेत शुभांगी रामदास खरे.