

Thomas Paine Common Sense Rights of Man
esakal
१८व्या शतकातील राजकीय-वैचारिक अस्थिरता, वसाहतवादाचा विस्तार आणि साम्राज्यांचे वाढते दडपण या काळात थॉमस पेन हे नाव लोकशाही, स्वातंत्र्य आणि मानवी समानतेचा ध्वज उंच फडकवणारे ठरले. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध असो की फ्रेंच क्रांती दोन्हींच्या वैचारिक पायाभरणीत थॉमस पेनचे स्थान अद्वितीय आहे. त्याचे लेखन, तर्कवादी भूमिका, आणि सामाजिक न्यायाची ज्वलंत जाणीव यामुळे तो आधुनिक लोकशाहीचा बौद्धिक शिल्पकार मानला जातो.