Premium|Personal Life Support System : सुखी आणि सुरक्षित आयुष्यासाठी या ‘तीन एक्क्यांचे’ महत्त्व समजून घ्या

Why a Trusted Driver Matters : ड्रायव्हर, घरकाम करणारी मदतनीस आणि विश्वासू सहायक हे दैनंदिन जीवनातील अदृश्य आधारस्तंभ आहेत. त्यांची निवड, विश्वास, सुरक्षितता आणि सन्मान याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
Personal Life Support System

Personal Life Support System

esakal

Updated on

चकोर गांधी - chakorgandhi@gmail.com

आपल्या आयुष्यात यश, पैसा, प्रतिष्ठा आणि मोठेपणा यांची चर्चा नेहमी होत असते; पण आपले दैनंदिन आयुष्य खऱ्या अर्थाने सुरक्षित, सुखकर आणि शांत ठेवणाऱ्या काही व्यक्तींकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ड्रायव्हर, घरकाम करणारी मदतनीस आणि विश्वासू सहायक, या तीन व्यक्ती आपल्या आयुष्याचे अदृश्य आधारस्तंभ असतात. त्यांचे महत्त्व वेळ आली, की प्रकर्षाने जाणवते. म्हणूनच या तीन व्यक्तींना मी ‘वैयक्तिक जीवनातील तीन एक्के’ असे म्हणतो.

आपल्या आयुष्यात अनेक माणसे महत्त्वाची असतात. परंतु, ड्रायव्हर, घरकाम करणारी मदतनीस आणि विश्वासू सहायक या तीन व्यक्ती नेहमीच्या नात्यांपलीकडे जाऊन अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. म्हणून त्यांना ‘तीन एक्के’ असे म्हटले आहे. या व्यक्तींचे महत्त्व आपल्या दैनंदिन जीवनात फार मोठे असते; पण अनेकदा ते आपल्याला जाणवत नाही. आपले सुख, आनंद आणि दैनंदिन आयुष्य मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर अवलंबून असते.

१. ड्रायव्हर

प्रथम म्हणजे ड्रायव्हर. ही व्यक्ती आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. नवा ड्रायव्हर शोधताना आपण खरंच पुरेशी काळजी घेतो का? जाहिरात देताना आपण ‘निर्व्यसनी’, ‘प्रामाणिक’, ‘गरजू’ असे शब्द सहज लिहितो; पण कोणताही ड्रायव्हर स्वतःहून हे सांगत नाही. त्यामुळे फक्त जाहिरातीत शब्द लिहिण्यापेक्षा त्याचा व्यवस्थित इंटरव्ह्यू घेणे अधिक गरजेचे आहे. ड्रायव्हरची नेमणूक केल्यानंतर त्याला सर्व नियम स्पष्टपणे सांगायला हवेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्याची ड्रायव्हिंग टेस्ट घेणे आवश्यक आहे. आपण स्वतःचे आणि कुटुंबीयांचे आयुष्य या व्यक्तीच्या ताब्यात देत असतो. म्हणून ड्रायव्हर सुरक्षितपणे वाहन चालवणारा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याची किंमत म्हणजे आपले आणि आपल्या कुटुंबाचे आयुष्य इतकी असते. अनेक वेळा आपण फोनवर बोलत असतो. आपल्या वैयक्तिक गोष्टी, नातीगोती, पत्ते, व्यवहार या सर्वांची माहिती ड्रायव्हरला असते. त्यामुळे तो विश्वासू आणि गोपनीयता पाळणारा असणे खूप महत्त्वाचे आहे. ड्रायव्हरने ब्लॅकमेल केल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. आपण चांगल्या भावनेने पाहुण्यांसाठी गाडी आणि ड्रायव्हर पाठवतो; पण ड्रायव्हरचे वर्तन व्यवस्थित नसेल, तर आपले इम्प्रेशन खराब होते. नम्रता हा त्याच्या स्वभावातील महत्त्वाचा गुण असला पाहिजे. सकाळी महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जायचे असेल आणि ड्रायव्हर वेळेवर आला नाही, तर आपले मोठे नुकसान होऊ शकते. काही वेळा गाडीत मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्कम असते. त्यामुळे त्याच्यावर विश्वास असणे आणि त्याने तो टिकवून ठेवणे आवश्यक आहे. ड्रायव्हर निर्व्यसनी, सुरक्षित वाहन चालवणारा, गोपनीयता राखणारा आणि कुटुंबीयांची; तसेच पाहुण्यांची काळजी घेणारा असावा. बाहेरगावी गेल्यावर त्याच्या राहण्याची आणि विश्रांतीची योग्य व्यवस्था करणेही गरजेचे आहे. त्याला योग्य पगार आणि सन्मान दिला पाहिजे, कारण आपल्या सुरक्षिततेचा आणि आनंदाचा मोठा भाग त्याच्यावर अवलंबून असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com