

Vision and Mission in Business
esakal
प्रतीक डुंबरे - capsdumbre@gmail.com
ते नाली रामन- मध्ययुगीन इतिहासातील एक बुद्धिमान, मिश्कील आणि हजरजबाबी व्यक्तिमत्त्व! आजच्या एकविसाव्या शतकात एका काल्पनिक साम्राज्यातील हा तेनाली आपल्या महाराजांशी संवाद साधत व्यवसायातील काही महत्त्वाची रहस्ये उलगडतो. व्यवसायाला शिस्त कशी लावायची, नफा कसा वाढवायचा आणि लघु-मध्यम उद्योजकांना योग्य दिशा कशी मिळवून द्यायची हे तो सांगत आहे, ‘तेनाली व्हॅल्यू फ्रेमवर्क’च्या माध्यमातून...
रबार भरला होता. निमंत्रितांची मांदियाळी जमली होती. मंत्रिमंडळातील सर्व मानकरी उपस्थित होते. महाराजांचा लाडका तेनाली आपल्या आसनावर बसून गुणगुणत होता-
‘‘मुसाफिर हूं यारो... ना घर है ना ठिकाना...’’ तेवढ्यात महाराजांचे आगमन झाले. सर्वजण सावरून उभे राहिले आणि नमस्कार करू लागले...
‘‘महाराजांचा विजय असो!’’धनाजीरावांनी पेढा भरवत म्हटले.
महाराजांनी आनंदाने पेढा खात विचारले, ‘‘काय मिस्टर धनाजीराव, पेढ्यांचं काय निमित्त?’’