Career Plan B
Esakal
पुणे – एपीएससीसाठी १० ते १२ लाख, सीईटीसाठी ७ लाख, शिक्षक भरतीसाठी ४ ते ५ लाख, पोलिस भरतीसाठी ५ ते ८ लाख असे साधारण वर्षाला २५ लाख विद्यार्थ्यांचे अर्ज दरवर्षी येतात. एकच विद्यार्थी एकापेक्षा जास्त ठिकाणी अर्ज करतो असे गृहित धरले तरीही साधारण १५ ते २० लाख विद्यार्थी हे महाराष्ट्रातून या परीक्षांसाठी तयारी करत असतात. यासाठी जागा मात्र जेमतेम हजार दोन हजार. तज्ज्ञ सांगतात ‘प्लॅन बी’ तयार ठेवा. पण प्रत्येकच क्षेत्रात नोकरीची वाणवा पहाता नेमका अभ्यास करायचा तरी कशाचा आणि ‘प्लॅन बी’ साठी कोणत्या विषयांची निवड करावी असा प्रश्न पडतो.
येत्या काळात जागतिक स्तरावर कोणत्या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याविषयी जागतिक अभ्यास काय सांगतात, भारत सध्या कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहे, भारतातले अभ्यास याविषयी काय सांगतात आणि यासाठी तरूणांनी कोणते कोर्सेस करायला हवेत हे सगळं सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.