

Famous forts Near Pune
esakal
पुणे जिल्ह्यातील तोरणा किल्ला उंच, दुर्गम आणि ऐतिहासिक आहे. त्याची लांबी, रुंदी आणि उंची प्रचंड असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला ‘प्रचंडगड’ असे नाव दिले. स्वराज्याची पहाट तोरणा किल्ल्यावरूनच उगवली. तोरणा किल्ला म्हणजे स्वराज्याचा अरुणोदय आहे.
तोरणा जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यावर बांधकाम सुरू केले. गडावर अनेक इमारती बांधल्या. मजबूत तटबंदी बांधली. देवालयांचा जीर्णोद्धार केला. महाद्वाराचे बांधकाम केले. हे बांधकाम सुरू असताना त्यांना सुवर्ण मोहरांचा हंडा सापडला.