Premium| Konkan Food Culture: खाद्यसंस्कृतीचा राजेशाही थाट!

Beyond Coconut: कोकणची खाद्यसंस्कृती म्हणजे निसर्ग, परंपरा आणि चव यांचं सुंदर मिश्रण. प्रत्येक घासात कोकणची ओळख!
Konkan food culture
Konkan food cultureesakal
Updated on

सतीश पाटणकर

कोकणची खाद्यसंस्कृती जगात भारी असे म्हटल्यास अजिबात वावगे ठरणार नाही. इथल्या पदार्थांच्या प्रत्येक घासाला कोकणाचा सुगंध आणि चव आहे. इथल्या चिंच, कोकम, नारळ, वैशिष्ट्यपूर्ण मसाले आणि साध्या फोडणीतून निर्माण होणारी चव चिभेवर रेंगाळत राहते. पौष्टिक, सहज पचणारे, तरीही चविष्ट हे इथल्या खाद्यसंस्कृतीचे वैशिष्ट्य!

कोकण म्हटलं की नारळ, पोफळी, काजू, आंबा, कोकम यांच्या जोडीने सह्याद्रीतून वाहणाऱ्या नद्या, किनाऱ्यावरचा अथांग समुद्र अशा कितीतरी गोष्टी डोळ्यासमोर येतात. या प्रत्येक निसर्गदेणगीत वेगळेपण आहे. इथल्या खाद्यसंस्कृतीतही हा देखणेपणा, खमंगपणा, अफलातून चव आणि कोकणचे वेगळेपण ठासून भरलेले दिसते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com