
संदीप खांडेकर
इथली लाल माती आणि कुस्ती यांची नाळ घट्ट आहे. शहरातील प्रत्येक पेठेतील तालमींमध्ये असलेले आखाडे हे इथले वैशिष्ट्य. शरीर पिळदार करत कुस्तीत नावलौकिक मिळविण्याची किमया पैलवानांनी साधली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्तीला राजाश्रय दिल्यामुळे ग्रामीण भागात घरटी पैलवान तयार झाले. शरीराला आकार देण्यासाठी आजची पिढी आखाड्यांसोबतच जिमपर्यंत पोहोचली आहे. येथील संस्कृती, जीवनशैली व तत्त्वज्ञानाचा सुरेख संगम त्यातून साधला गेला आहे.