

Forest Rights Act implementation in Maharashtra tribal areas
esakal
वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, वनजमीन व गायरान धारकांना स्वतंत्र सातबारा उतारा मिळावा, शिक्षणाचे खासगीकरण थांबवा आणि पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी स्थानिकांना प्राधान्याने द्यावे, अशा स्वरूपाच्या नऊ प्रमुख मागण्या घेऊन नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेले अखिल भारतीय किसान सभेचे ‘लाल वादळ’ रस्त्यातच शमविण्यात राज्य शासनाला यश मिळाले. यापूर्वी तीन वेळा मोर्चा निघूनही हे प्रश्न का सुटलेले नाहीत, याचा विचार व्हायला हवा. तीन वेळा तोंडाला पाने पुसल्यानंतर चौथ्यांदा आश्वासनांचे गाठोडे घेऊन अर्ध्या रस्त्यातून माघारी परतलेल्या आदिवासींना आता तरी न्याय मिळेल का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.